एलेन शोवॉल्टरप्रणीत स्त्रीविशिष्ट अनुभव: संकल्पना व उपयोजन
स्त्रीकेंद्री समीक्षा: व्हर्जिनिया वुल्फच्या तत्त्विक भूमिकेवर आधारित
by Dr. Sheetal Pawaskar Bhosale*,
- Published in Journal of Advances and Scholarly Researches in Allied Education, E-ISSN: 2230-7540
Volume 13, Issue No. 2, Jul 2017, Pages 940 - 944 (5)
Published by: Ignited Minds Journals
ABSTRACT
पुरुषकेंद्री (Androcentric) तत्त्वविचारातील मूल्यनिकषांपेक्षा वेगले निकष मानणाऱ्या स्त्रीकेंद्री समीक्षापद्धतीची (Gynocentric Criticism) गरज निर्माण होणे, हा स्त्रीच्या आत्मशोधनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्त्रीकेंद्री समीक्षेचा प्रारंभबिंदू म्हणून, व्हर्जिनिया वुल्फप्रणीत तात्त्विक भूमिकेकडे निर्देश केला जातो. आणि या समीक्षापद्धतीची सैद्धांतिक मांडणी करण्याचे श्रेय, अँग्लो-अमेरिकन स्त्रीवादी समीक्षक एलेन शोवॉल्टर यांना दिले जाते.
KEYWORD
स्त्रीविशिष्ट अनुभव, पुरुषकेंद्री तत्त्वविचार, मूल्यनिकष, स्त्रीकेंद्री समीक्षा, आत्मशोधन, व्हर्जिनिया वुल्फ, सैद्धांतिक मांडणी, अँग्लो-अमेरिकन स्त्रीवादी समीक्षक, एलेन शोवॉल्टर